शिक्षण
गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वह्या-पुस्तके व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते. उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केले जाते.
शिक्षण
प्रिय कोकणवासीयांनो,
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आपण सर्वाच्या सहकार्याने जे कार्य उभं राहिलं आहे,त्यामागे एकच ध्येय आहे - कोकणातील प्रत्येक कुटुंब सक्षम व्हावं, प्रत्येक मुलाला संधी मिळावी आणि कोणताही समाजघटक मागे राहू नये..
२००८ साली जेव्हा या प्रवासाची सुरुवात केली,तेव्हा माझ्या मनात एकच प्रश्न होता - • आपल्या कोकणातील मुलं शिक्षण, आरोग्य आणि संधीपासून वंचित का राहावीत? याच प्रश्नाचं उत्तर शोधत आम्ही शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्पर्धा परीक्षा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात काम सुरू केलं.
आज कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये ४८ स्पर्धा परीक्षा वाचनालये व अभ्यासिका, ३८ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि विविध मार्गदर्शन केंद्रे कार्यरत आहेत, हे केवळ आकडे नाहीत - ही हजारो तरुणांच्या स्वप्नांची उभारणी आहे. ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेत प्रवेश करावा, स्वतःच्या कुटुंबाचा आणि समाजाचा अभिमान वाढवावा,हा आमचा मुख्य उद्देश आहे.
याचबरोबर,दरवर्षी ३५ लाख वह्यांचे वाटप करून आम्ही गावा गावात, वाड्या वस्त्यांमध्ये पोहोचतो. पण हे फक्त वह्यांचे वाटप नसून, त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मुलापर्यंत "तूही करू शकतोस हा विश्वास पोहोचवतो. करिअर मार्गदर्शन, विविध शैक्षणिक संधी आणि योग्य दिशा देणं हेही आमचं तितकंच महत्वाचं काम आहे.
आरोग्य हा विषय माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे... कारण कोकणातील अनेक घरांमध्ये मी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे - आजारी माणूस असतो...पण उपचारासाठी पैसे नसतात... आणि मग निर्णय घ्यावा लागतो - उपचार करायचे की थांबायचं... ही वेळ कोणावरही येऊ नये, म्हणून आम्ही ठरवलं उपचार हे पैशांवर अवलंबून नसावेत...ते माणुसकीवर आधारित असावेत. आज पालघर, शहापूर आणि रत्नागिरी येथे सुरू असलेली आपली तीन मोफत रुग्णालये ही त्या विचाराची साकार रूपं आहेत. ही रुग्णालयं म्हणजे केवळ उपचाराची ठिकाणं नाहीत...
तर ती आशेची दारं आहेत...जिथून अनेकांना नवजीवन मिळतं.
या रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन, एक्स-रे,सोनोग्राफी, डायलिसिस यांसारख्या अत्यावश्यक सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जातात...
रुग्णांना लागणारी सर्व औषधं विनामूल्य पुरवली जातात...
पण एक गोष्ट मी अभिमानाने सांगू इच्छितो -
सेवा मोफत असली, तरी तिचा दर्जा कधीच तडजोडी मध्ये मोजला नाही!
आपल्या प्रत्येक रुग्णाला आम्ही सर्वोत्तम उपचार,आदर आणि आपुलकी देण्याचा प्रयत्न करतो...
कारण आमच्यासाठी तो “रुग्ण" नाही... तो आपल्या घरचाच एक माणूस आहे. कोकणातील डोंगर-दऱ्यांमध्ये, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या माणसाला जर वेळेवर उपचार मिळाले... तर तो फक्त बरा होत नाही - तो पुन्हा उभा राहतो... त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहतं... आणि एक संपूर्ण समाज पुढे जातो. समाजाची खरी उभारणी तेव्हाच होते जेव्हा आपल्या माता-भगिनी सशक्त होतात. म्हणूनच महिला सक्षमीकरण हा आमच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देत आम्ही त्यांच्या हातात स्वाभिमानाचं बळ देण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वतःच्या • पायावर उभी राहिलेली स्त्री म्हणजे संपूर्ण कुटुंबाला उभं करणारी शक्ती - हा आमचा ठाम विश्वास आहे. आजच्या डिजिटल युगात ज्ञानासोबत तंत्रज्ञानाचं भान असणं अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील युवक-युवर्तीसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्रे म्हणजे नव्या युगाच्या दाराची किल्ली आहेत - जिथून अनेक तरुण स्वतःच्या करिअरचा नवा मार्ग शोधत आहेत. माझ्यासाठी ही संस्था केवळ एक संघटना नाही,तर कोकणाच्या भविष्याचा संकल्प आहे. या कार्यासाठी लागणारा प्रत्येक प्रयत्न,प्रत्येक संसाधन मी माझ्या जबाबदारीचा भाग समजून देत आलो आहे आणि पुढेही देत राहीन. माझी एकच अपेक्षा आहे - कोकणातील प्रत्येक तरुणाने मोठं स्वप्न पाहावं, मेहनत घ्यावी आणि यशस्वी होऊन समाजासाठी उभं राहावं. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, विश्वासाने आणि आशीर्वादाने हा प्रवास अधिक व्यापक आणि प्रभावी बनवूया. "जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था” – ही केवळ संस्था नाही नाही, तर सुशिक्षित, सुसंस्कृत, निरोगी, स्वावलंबी, स्वाभिमानी समाज घडविण्याची एक चळवळ आहे.
आपलाच,
श्री. निलेश भगवान सांबरे — संस्थापक, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र
आमच्या विविध उपक्रमांद्वारे आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकाला सहाय्य करतो.
गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वह्या-पुस्तके व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते. उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केले जाते.
शिक्षणतज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय तपासणी, औषधे व आरोग्य मार्गदर्शन. रक्तदान शिबिरांचे नियमित आयोजन.
आरोग्यमहिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन व आर्थिक स्वावलंबनाचे उपक्रम राबविले जातात.
सक्षमीकरणप्रतिवर्षी 200 करिअर मार्गदर्शन शिबिर, UPSC/MPSC प्रशिक्षण राबवले जातात
रोजगारयुवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, कॉम्प्युटर शिक्षण आणि नोकरी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन.
कृषीआरोग्य शिबिरामध्ये माझ्या आजारावर वेळेत उपचार झाले. मोफत औषधे मिळाली. संस्था खऱ्या अर्थाने आधारवड आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे मला स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला. संस्थेने केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर आत्मविश्वास दिला.
मी जिजाऊ आरोग्य शिबिराला भेट दिली आणि खूप चांगला अनुभव आला. डॉक्टरांनी व्यवस्थित तपासणी करून योग्य मार्गदर्शन दिलं. सर्व व्यवस्था नीट होती आणि स्वयंसेवक खूप मदतीचे होते.
कोणत्याही प्रश्नासाठी, सहाय्यासाठी किंवा सहभागासाठी आमच्याशी संपर्क साधा.
आम्हाला भेट द्या, फोन करा किंवा संदेश पाठवा. आम्ही सर्वदा आपल्यासाठी उपलब्ध आहोत.
आम्ही २४ तासांत उत्तर देऊ.