जिजाऊ संस्थेमार्फत रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ७ वेगवेगळ्या ठिकाणी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण व सैन्य प्रशिक्षण केंद्र चालविले जात आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना ये-जा करणे किंवा प्रवास करणे सोयीचे नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. ही निवासी केंद्रे खालील ठिकाणी कार्यरत आहेत:चिपळूण व चाफे
खालील ७ ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व पोलीस अकॅडमी कार्यरत आहेत: रत्नागिरी,चाफे,लांजा,गुहागर,देवरुख,सापुचेतळे आणि चिपळूण
जिजाऊ संस्थेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस अकॅडमीचा प्रवास पालघर जिल्ह्यापासून सुरू झाला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधील हजारो विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय सेवेत यश संपादन केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, अल्पावधीतच येथेही स्पर्धा परीक्षा केंद्रे यशस्वीपणे कार्यरत झाली आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातून आतापर्यंत ५२ विद्यार्थी पोलीस भरती,सैन्य भरतीमध्ये ,महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच शासनाच्या विविध विभागांमध्ये नियुक्ती झाली आहे.
जिजाऊ संस्थेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
पूर्णतः मोफत मार्गदर्शन व समुपदेशन,नियमित मोफत सराव परीक्षा,मोफत अभ्यास साहित्य व पुस्तके,विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका सुविधा
जळगाव, पुणे, धुळे, नाशिक येथून येणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकांकडून अध्यापन,पूर्णतः परीक्षाभिमुख व दर्जेदार शिक्षण पद्धती
संस्था शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे:शाळा व गाव पातळीवर मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या जातात.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार योग्य क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
तसेच खालील शालेय स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिरे विविध शाळांमध्ये दरवर्षी आयोजित केली जातात:
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
राष्ट्रीय मिलिटरी स्कूल,NMMS परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा
२०१४ पासून दरवर्षी कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये ३५ लाख वह्यांचे मोफत वाटप केले जाते
सामान्य कुटुंबातील मुलं व मुलींना डॉक्टर व इंजिनिअर होण्यासाठी निवासी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संस्थेमार्फत JEE व NEET परीक्षांसाठी विशेष निवासी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते:दरवर्षी प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यांत घेतली जाते.इयत्ता ८ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवासी स्वरूपात संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते
कोकणच्या विकासासाठी स्थानिक युवकांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांद्वारे करिअर घडवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला शिक्षण, आरोग्य व सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अखंडपणे कार्य करणे. दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
पारदर्शकता, निष्ठा, सेवाभाव व समानता या मूल्यांवर आमचे कार्य चालते. राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांना आमच्या कार्याचा आधार मानतो.
या तत्त्वांनी आमच्या कार्याला दिशा दिली आहे.
स्वार्थाशिवाय निस्वार्थपणे समाजाची सेवा करणे हे आमच्या कार्याचे मूळ तत्त्व आहे. प्रत्येक स्वयंसेवक सेवेला प्राधान्य देतो.
संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाचा, आर्थिक व्यवहाराचा पारदर्शक हिशेब ठेवला जातो. दात्यांचा विश्वास जपणे आमची जबाबदारी आहे.
जात, धर्म, लिंग व आर्थिक स्थिती विचारात न घेता सर्वांना समान सेवा देण्यावर आमचा विश्वास आहे.
एकदा घेतलेल्या कार्याला अखेरपर्यंत न्याय देणे, संकटातही डगमगून न जाणे हे आमचे व्रत आहे.
समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सहभागातून शक्ती निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
केवळ तात्पुरती मदत नव्हे, तर कायमस्वरूपी बदल घडवण्यासाठी आत्मनिर्भर समाज घडवण्याचे आम्ही काम करतो.
समाजसेवेतील योगदानाबद्दल मिळालेले पुरस्कार व मान्यता.
संस्थेच्या कार्यात सहभागी व्हा. स्वयंसेवक म्हणून किंवा जनजागृतीसाठी — आपले योगदान समाजाला बदलू शकते.