Nilesh sambare रत्नागिरी दौरा ऑगस्ट 2026
जिवे बु. येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला जिजाऊची साथ
देवरुख तालुक्यातील जिवे बु. येथील गरजू विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रच्या वतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या उपक्रमातून कोकणातील शिक्षणाच्या वाटचालीला आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.