Nilesh sambare रत्नागिरी दौरा ऑगस्ट 2026
सैतवड्यात विद्यार्थ्यांना ‘जिजाऊ’चा शैक्षणिक आधार
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथे गरजू शालेय विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने राबवलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळाला.