स्पेशल प्रोग्राम
मूकबधिर युवतीच्या स्वावलंबनासाठी जिजाऊ संस्थेकडून शिलाई मशीन भेट
रत्नागिरीतील भोके येथील मूकबधिर युवती कुमारी श्रुती गावडे हिला स्वावलंबी जीवनाची नवी दिशा मिळावी या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने शिलाई मशीन भेट देण्यात आली. सामाजिक बांधिलकी, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाचा संदेश देणारा हा प्रेरणादायी उपक्रम ठरला.